आंबी पोलिस व गुरुगादी भैरवनाथ च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
आंबी पोलिस व गुरुगादी भैरवनाथ च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम अंतर्गत आंबी पोलिस व भैरवनाथ जोगेश्वरी संस्थान गुरुगादी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौणिमेचे औचित्य साधून दि १३ जुलै रोजी सोनारी येथे रक्तदान रक्तदान शिबिर घेन्यात आले व गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबीराचे उदघाटन महंतपीर शामनाथ महाराज यांचा हस्ते करन्यात आले .
या रक्तदान शिबीरा मध्ये अंबी चे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष खांडेकर यांच्या सह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले .
यावेळी सोनारी येथिल जिप शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करून गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप
करन्यात आले .
यावेळी काकासाहेब पवार , सहाय्यक पोनि खांडेकर , माजी जिप उपाध्यक्ष धनंजय सावंत , नवनाथ जगताप , माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल , संजय महाराज , महाविर तनपुरे ,यांच्या सह मान्यवर उपस्थित होते .
Comments
Post a Comment