सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकाने साजरा केला वाढदिवस
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकाने साजरा केला वाढदिवस
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ७ ) शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे त्यामध्ये शिक्षकांनी विविध कार्यात सामाजिक सहभाग नोंदवला म्हणजे एक आदर्शवत उपक्रम होतो .याच बांधिलकी ने आज मौजे कात्राबाद येथे जि प शाळा कात्राबाद शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री रविंद्र माधव कापसे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आणि देवीच्या मंदिरासमोर नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.याचबरोबर गटशिक्षण कार्यालयासमोर नारळाची रोपे लावली व कार्यालयाच्या आवारात सिमेंट बेंच बसण्यासाठी भेट दिला यावेळी तालुक्यातील शिक्षक मित्र परिवार होते.कात्राबाद येथे शाळेचे मु अ अलबते सर,कापसे सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गरड,ग्रामसेवक शिंदे,ग्रामपंचायत सदस्य गोकुळ गरड, गणेश कोकाटे,परशराम कोळी,विलास गरड,दादा गरड,गोपीनाथ बोराडे,भास्कर गरड,अंगद भोसले,जेजेराम गरड,पै. शिवाजी काळे,नितीन शेळके,संतोष बोराडे,अक्षय गरड व ग्रामस्थ उपस्थित होते.सामाजिक कार्याचा आदर्श इतर शिक्षक समाज घटकांनी घेणे काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment