राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पाटणबोरी शाखेची कार्यकारणी गठीत
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी रामेश्वर पुदरवार
आज पाटणबोरी येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक संतोष नक्षत्रे यांचे निवासस्थानी व नंदुअण्णा अरर्गुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सर्वांनुमते राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पाटणबोरी अध्यक्ष ओमकार डब्बावार, उपाध्यक्ष मोहन एनगुर्तीवार, सचिव रामेश्वर पुदरवार, कार्याध्यक्ष संदीप सुरपाम, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत लसते, कोषाअध्यक्ष गजानन राजुलवार, सहसचिव मोबीन तगाले, तसेच सल्लागार म्हणून नंदूअण्णा अरर्गुलवार , गजू अग्रवाल, गोपाल शर्मा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्य म्हणून निलेश यमसनवार, चंद्रशेखर सिडाम, अनिल पुल्लजवार, सागर गंगशेट्टीवार, भास्कर मालिकर ,संकोच चांदेकर, संतोष कायतवार, संतोष नक्षणे, मनीष अग्रवाल, प्रमोद तोटावार, अमीन जाटु, इत्यादी पत्रकारांचा समावेश करण्यात आला .
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या आदेशानुसार विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी ही नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे श्रेय विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान विदर्भ प्रदेश सचिव रवींद्र चरडे विदर्भ प्रदेश सहसचिव रामेश्वर पुदरवार जिल्हा उपाध्यक्ष अनिल पुल्लजवार यांना देण्यात आले. तसेच नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांना नियुक्ती प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment