पत्रकारिता पदवी परीक्षेत अंकुश आतकर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पत्रकारिता पदवी परीक्षेत अंकुश आतकर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुर्डुवाडी दि.(प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदवी परीक्षेत बारलोणी(ता.माढा) येथील अंकुश आतकर यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन वयाच्या ५० वर्षी जिद्द चिकाटीच्या जोरावर विजयाला गवसणी घातली.
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयातून बॅचलर ऑफ जर्नालिझम(बी. जे.) ही पदवी संपादन केली यांचे पूर्व माध्यमिक शिक्षण नगरपालिका प्रशाला कुर्डुवाडी येथुन तर उच्च माध्यमिक शिक्षण के.एन भिसे महाविद्यालयातून पूर्ण झाले
सन १९९९ साली बातमीदारीस सुरुवात केली आजपर्यंत बऱ्याच वृत्तपत्रामध्ये कामकाज पाहिले असून कला क्षेत्रात सुद्धा त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. ते विविध पुरस्काराचे मानकरी ठरले असून २००० साली ग्रामपंचायत सदस्यांचा पदभार सांभाळला आणि ते आज संपादक म्हणून कार्यरत आहेतत्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश पोकळे , सचिव गणेश पोकळे ,प्राचार्य बाबासाहेब हावळे, ग्रंथपाल सुहास गाढवे, परीक्षा प्रमुख श्री वैजिनाथ शिंदे , पल्लवी मुजमुले आदिंचे मार्गदर्शन लाभले .
Comments
Post a Comment