दार उघड बये दार उघडं अशी हाक देत आई श्री तुळजाभवानी मातेला घातली साद
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर - शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या नीलमताई गोऱ्हे यांनी आज तुळजापुर येथे तुळजाभवनीचे दर्शन घेतले दार उघड बये दार उघडं अशी हाक देत आई श्री तुळजाभवानी मातेला साद घातली, नवरात्र महोत्सवात पाचव्या माळेला ललित पंचमी निमित्ताने मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती यावेळी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दर्शन घेतले.
शिवतीर्थावर होणाऱ्या पारंपारीक दसरा मेळाव्यासाठी भवानी ज्योत प्रज्वलित करून आई भवानी मातेचा आशीर्वाद घेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सूख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना केली. महाराष्ट्र राज्यातील 61 तीर्थक्षेत्रिच्या ठिकाणी भवानी ज्योत आणि दार उघड बये दार उघडं अभियान उत्स्फूर्तपणे शुभारंभ करण्यात आला असल्याने यावेळी निलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.राज्य सरकार विकास कामे करण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकीय कुटील कारस्थान करण्यात व्यस्त आहे,विविध प्रश्न प्रलंबित असून सोयीस्कर बगल देण्याचे काम सुरू असल्याची टीका यावेळी केली.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे,झेलम जोशी,सम्पर्क प्रमुख अनिल खोचरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार (वडणे),सोलापूर महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड,सुखताई लटपटे,परभणी महिल जिल्हाप्रमुख .सांगली महिल जिल्हाप्रमुख सुनिताताई मोरे, सुरेखाताई मुळे,शितलताई देवरूखकर,दिपाताई पाटील,शाम पवार,सुधीर कदम, सुनील जाधव,सागर इंगळे,चेतन बंडगर,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment