रेल्वे प्रवासी संघ नाशिक व मौलाना आझाद विचार मंच यांच्या वतीने मनमाड मुंबई सुपरफास्ट गोदावरी अपडाऊन करणाऱ्या पासधारकांना गुलाब पुष्प मिठाई देऊन संविधान दिन साजरा
रेल्वे प्रवासी संघ नाशिक व मौलाना आझाद विचार मंच यांच्या वतीने मनमाड मुंबई सुपरफास्ट गोदावरी अपडाऊन करणाऱ्या पासधारकांना गुलाब पुष्प मिठाई देऊन संविधान दिन साजरा
पुज्य नगरी न्यूज ( प्रतिनिधी मुक्ताराम बागुल )
नाशिक (दि २९ )
रेल्वे प्रवासी संघ नाशिक जिल्हा व छत्रपती महामानव मौलाना आझाद विचार मंच यांच्या विद्यमाने मनमाड मुंबई सुपरफास्ट गोदावरी एक्सप्रेस मध्ये भारतीय संविधान दिनानिमित्ताने अपडाऊन करणाऱ्या पास धारकांना गुलाब पुष्प व मिठाई देऊन संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन इगतपुरी येथील माजी नगरसेवक समाजसेवक आयात खान यांनी केले होते. यावेळी आयात खान यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
महामानव मौलाना आझाद विचार मंच यांच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर संजय मोरे, सुदाम मामा, डी एस वाणी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गोदावरी एक्स्प्रेसने दररोज अपडाऊन करणाऱ्या पाच धारकांना गुलाब पुष्प मिठाई व अल्पोहार देण्यात आला. याप्रसंगी अरविंद तोरणे, राजेश तायडे, हेमंत खरे, डि एस सेंड मॅडम, एस एस अहिरे मॅडम, प्रकाश भामरे यांच्यासह किरण चिमा, सतीश सावळे, सचित खान, अखिल शेख, दिलीप भडांगे, डॉक्टर प्रदीप कांगणे, निलेश पवार, किशोर वैद्य, सुनील गांगुर्डे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment