होमगार्ड व नागरिक संरक्षण दल 76 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी मुक्ताराम बागुल 

होमगार्ड व नागरिक संरक्षण दल 76 वा वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक 7 डिसेंबर  ते १३ डिसेंबर पर्यंत जिल्हा समादेशक माधुरी केदार (कांगणे) अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या उपस्थितीत विविध  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .

 दिनांक सात डिसेंबर  रोजी होमगार्ड व नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्तपणे पिंपळद या गावी जिल्हा परिषद शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक व मापड्रिल करण्यात आली. नाशिक शहर होमगार्ड तर्फे साफसफाई  करण्यात आले. दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी सिविल हॉस्पिटल कडील प्रवरा मेडिकल ट्रस्ट एफ एस डब्ल्यू टी आय नाशिक व डॉक्टर राहुल भोसले  हॉस्पिटल आनंदवली व डॉक्टर देवांशी दिनेश पवार फिजोथेरपी अशोक हॉस्पिटल यांच्याकडून विनामूल्य वर्धापन दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिरात 
नाशिक शहर होमगार्ड पुरुष, महिला यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

  सदर कार्यक्रमाच्या वेळेस जिल्हा समादेशक माधुरी केदार (कांगणे) अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व जिल्हा समादेशक होमगार्ड नाशिक माननीय दिनेश बाळासाहेब पवार द्वितीय जिल्हा समादेशक तथा नाशिक शहर समादेशक सुरेश जाधव प्रशासकीय अधिकारी, नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालय  अरुण तडवी  केंद्र नायक नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालय पंकज नेरकर वरिष्ठ लिपिक, गणेश राजेंद्र सोनवणे कंपनी कमांडर नाशिक जिल्हा, सुमंत महाजन पलटण नायक नाशिक शहर, सिविल हॉस्पिटल कडील वैद्यकीय तपासणी टीम डॉक्टर प्रियंका डांगळे, डॉक्टर विनोद वानखेडे, डॉक्टर राकेश सोनवणे, प्रवरा मेडिकल ट्रस्ट कडील टीम डॉक्टर आदित्य माने, डॉक्टर सुरेखा खैरनार,
    .     तसेच अशोक हॉस्पिटलचे  डॉक्टर देवांशी  पवार, फिजोथेरपी इत्यादी  उपस्थित होते.

नाशिक शहर पथकातील जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या परिसरात 85 पुरुष होमगार्ड व 75 महिला होमगार्ड असे एकूण 160 होमगार्ड कर्मचारी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न