चिखली येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन सक्षणा सलगर यांच्या संघर्षमय वाटचालीचे कौतूक

चिखली येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
 उस्मानाबाद ( दि ४ )
देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे राज्यस्तरीय किशोर-किशोरी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि.4) विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या पुढाकाराने चिखली येथील पांडुरंग मंगल कार्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार जिल्हा परिषदचे गट नेते राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे जिल्हा उपाध्यक्ष सतीश एखंडे, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक पदाधिकारी
संगीता काळे राष्ट्रवादी युवती,  जिल्हा उपाध्यक्ष श्वेता दुरूगकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परंडाचे पदाधिकारी कातुरे पाटील, जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य ज्ञानेश्वर गीते, चिखलीचे सरपंच,  कबड्डीचे बंडू सुरवसे,यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणार्‍या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आ.मुंडे यांनी सक्षणाताई सलगर यांचे कौतुक केले. आपणही जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून मोठा संघर्ष केला. सक्षणाताईंचा संघर्ष देखील मोठा आहे. आगामी काळात त्यांच्या संघर्षाला यश मिळेल असा विश्वास आ. मुंडे यांनी व्यक्त केला.
स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल संयोजक तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी विद्यार्थी व प्रशिक्षकांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न