भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अविस्मरणीय : डॉ.बनसिंग भोई
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
(परंडा दि २३ )
२३ जानेवारी रोजी जिजाऊ महाविद्यालय,परंडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बनसिंग भोई उपस्थित होते.
यावेळी डॉ भोई म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यालाढ्यात नेताजी सुभाचन्द्र बोस यांचे अविस्मरणीय असे योगदान आहे जे आपण कधीही विसरू शकत नाही.
तसेच त्यांनी नेताजींच्या कार्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा बनसोडे यांनी तर आभार निर्मला साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला कार्यालयीन कर्मचारी योगेश वाघमोडे तसेच विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment