परंडा येथिल उरुसा निमीत्त दर्गाह येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
परंडा येथिल उरुसा निमीत्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ३० )
परंडा येथिल सुफीसंत हजरत खॉजा बद्रोदीन शाहिद यांच्या उरुसा निमीत्त दि ३१ जानेवारी रोजी दर्गाह येथे बार्शी येथिल सुविधा हॉस्पीटल च्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
दि ३१ रोजी पारंपारीक पध्दतीने उरूस साजरा करण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता तहसिल कार्यालयातून संदल मिरवणूकीस सुरुवात होईल , बॅन्ड पथकासह मिरवणूक रात्री १० वाजता दर्गाह येथे पोहचून प्रसाद वाटप करण्यात येणार आहे .
Comments
Post a Comment