परंडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूलच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप .
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा दि. 28 फेब्रुवारी रोजी परांडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल मध्ये इ 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ प्रतापसिंह पाटील यांचे चिरंजीव, इंग्लंड मध्ये अर्थशास्त्र पदवीप्राप्त कु करणसिंह पाटील हे खास शुभेच्छा देण्यासाठी इंग्लंड हुन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड सुभाष मोरे, आर. पी. सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खुळे, जिल्हा अध्यक्ष नागेश काशिद, युवा उद्योजक हनुमंत पाटील, ग्लोबल एडुकेशन चे संस्थापक गोरख मोरजकर, खंडेश्वर एडुकेशन ग्रुपचे संस्थापक नवनाथ खैरे, उद्योजक खदीरभाई शेख, महावीर करळे,रवी मोरे, गणेश काशीद, राम पाटील, विठ्ठल तिपाले,पंजाब घाडगे, सुदाम कापसे, जाधव सर, बोरकर सर, थिटे सर, विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य संतोष भांडवलकर, अशोक राठोड, प्रसाद अंधारे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करन पाटील यांनी केला. तसेच प्रमुख पाहुणे सुभाष भाऊ मोरे, नवनाथ खैरे, नागेश काशिद यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून करण पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान अवगत करून, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत उच्च शिक्षण घ्यावे.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षक यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेरे व अनुराधा गव्हाळे यांनी केले.सर्व शिक्षक, कर्मचारी व इ 9 वी च्या विद्यार्त्यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते.
Comments
Post a Comment