महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन* 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी येथील अटल टिंकरिंग लॅब चे उद्घाटन मा.डॉ.गणपतराव मोरे (शिक्षण उपसंचालक - लातूर विभाग,लातूर) यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब मिरगणे उपशिक्षणाधिकारी (माध्य.) .साकिब शेख (प्रोडक्शन हेड-लिविंग थिंग्ज), मा.डॉ. बी.वाय.यादव अध्यक्ष श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शीचे सचिव तथा महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या शाळा समितीचे चेअरमन .पी.टी.पाटील, संस्थेचे सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य .ए.पी. देबडवार , संस्थेचे खजिनदार ,.जे.सी.शितोळे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य.व्ही.एस.पाटील , बार्शी न.पा.शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक  संजय पाटील , टेक्नो संकल्प सोल्युशनचे सी.ई.ओ.घनश्याम पुराड, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.ए.बी.शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण जी.ए, उपमुख्याध्यापक .आर.बी. सपताळे,किमान कौशल्य विभाग प्रमुख .किरण गाढवे यांची सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक .चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच .एस.डी. देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.त्यानंतर .डॉ.गणपतराव मोरे, .साकिब शेख,.पी. टी.पाटील,.जे.सी.शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या अटल टिंकरिंग लॅबचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि या विद्यालयातून व संस्थेमधून भविष्यकाळात अनेक संशोधक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

तसेच बार्शी शहरांमध्ये अशा पद्धतीची अत्याधुनिक विज्ञान लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी विद्यालयातील सुरू असलेल्या विविध उपक्रमा बाबत समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.एस.एल.शिंदे व . देशमुख यांनी केले आणि  कार्यक्रमाच्या शेवटी विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती.एन.एस.पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य,मुख्याध्यापक, विविध शाखांतील विज्ञान शिक्षक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न