रमजान च्या पवित्र महिन्यात ६ वर्षीय आयेशा चा एक रोजा पुर्ण
रमजान च्या पवित्र महिन्यात ६ वर्षीय आयेशा चा एक रोजा पुर्ण
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ३० )
परंडा येथे कार्यरत असलेले पो.कॉ आफ्रोज शेख यांची ६ वर्षीय मुलगी आयेशा शेख हिने दि ३० मार्च रोजी रोजा केला आहे .कडक उन्हाळ्यात अन्न पाण्या शिवाय ६ वर्षीय आयेशाने रोजा पुर्ण केल्याने तिचे कौतूक करण्यात येत आहे .
रोजा चे महत्व फक्त धार्मिक नसुन शरीरा साठी वैज्ञानिक दृष्ट्या देखील फायदेशीर आहे .
तसेच या रमजान च्या उपासा मधून दिवसभर रोजा ( उपास ) केल्यावर मानवाला अन्न व पाण्याचे किती महत्व आहे याची देखील जानीव होते .
या पवित्र महिन्यातून ईश्वराने मानवाला त्याग, दया , दान करण्याचे शिकवण व त्याचे महत्व सांगीतले आहे ,
ज्यांचे कडे दान करन्या ईतकी ठरावीक रक्कम असेल त्यांना दान करण्याची सक्ती करण्यात आली असून . जकात च्या रूपाने गोर गरीबांना दान करणे , जेने करून त्यांना पावित्र महिन्यात गरीबांना देखील आनंदाने सन साजरा करता येईल ,
अश्या या पवित्र महिन्यात पुर्ण महिना भर रोजे ( उपहास ) करण्याचे प्रत्येकाला आदेशीत करण्यात आले आहे जेने करून मानवा वर ईश्वराने केलेल्या उपकाराचे स्मरण होत राहिल .
या रोजा तून लहान मुलांना सुट असली तरी लहान मुले घरातील आई वडिलांचे अनुकरण करत असतात व रोजा करण्याचे हट्ट करत असतात भर उन्हाळ्यात अन्न पाण्या शिवाय रोजा करणे सोपे नसले तरी लहान मुले रोजा करीत आहेत
Comments
Post a Comment