पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी महिलाना अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्का देऊन सन्मानीत करणार. सरपंच सौ .मासाळ



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

परंडा [दि२७ मे] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ३१ मे रोजी देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ढगपिपरीच्या सरपंच सौ.गुंफा लहू मासाळ यांनी दिली आहे 
      या पुरस्कारासाठी ढगपिंपरी ग्रामपंचायतकडे शासननिर्णया नुसार गावातील पाच महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.सदर अर्जाची दि.२७ मे रोजी छाननी होऊन दोन महिलांची निवड ग्रामस्तरीय पुरस्कार समिती करणार आहे.ग्रामस्तरीय पुरस्कार समिती मध्ये सरपंच,ग्रामसेवक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांचा समावेश आहे.
        निवड झालेल्या कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार २०२ ३-२४ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
     सदर सन्मान पुरस्कार सोहळा  दि.३१ मे रोजी सायंकाळी ७.३० वा ढगपिंपरी येथे संपन्न होणार आहे.पुरस्कार प्राप्त महिलांना शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रु.५००/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
     या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथील प्राध्यापिका सविता ताई दुधभाते व ग्लोबल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तथा जिजाऊ ब्रिग्रेडच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष आशाताई मोरजकर उपस्थित राहणार आहेत.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ गुंफाताई लहु मासाळ उपस्थित राहणार आहेत.तर या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण मुळे,महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण, पर्यवेक्षिका करुणा गायकवाड, विस्तार अधिकारी अशोक खुळे, शिक्षक समिती तालुकाध्यक्षा संजिवनी निकत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
तरी या कार्यक्रमाला सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ .मासाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न