आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २७ ऑगष्ट २०२४ आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर व मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामा मुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गटात ) आसु येथील युवकांचा दि २७ ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश केला आहे , विधानसभेच्या अनुषंगाने परंडा विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापत असताना परंडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटात मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक युवक व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत असल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकत वाढताना दिसत आहे. दि.२७ रोजी परंडा तालूक्यातील आसु येथिल सचिन पवार ,पंकज जाधव ,रणजित इतापे ,समाधान इतापे,नितीन वाघे,निखिल कोल्हे ,अनिल पवार ,चैतन्य पवार ,राज काकडे , ऋषिकेश चव्हाण ,कानिफ मासाळ ,हरी लोखंडे ,विनायक नेटके ,शाम परदेशी ,निखिल खुने , अनिकेत परदेशी ,विनोद इथापे ,संतोष पवार ,युवराज पवार ,मा...
जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज परंडा ( दि ११ ) आरोपी बजरंग उर्फ नारायण मारुती ताकमोडे, 2) सतिश बापू हगारे,3) दत्ता मारुती ताकमोडे, 4) गोपीनाथ मधु हगारे, 5) सधु बापु जेकटे, 6) बिरुदेव भानुदास जेकटे, 7) काशिनाथ मधु हगारे, 8) बाळु लक्ष्मण शिंगाडे, 9) नाना वायसे सर्व रा. ताकमोडवाडी ता. परंडा यांनी दि. 08.05.2024 रोजी 20.30 वा. सु. ताकमोडवाडी येथे फिर्यादी नामे- शेषनाथ लिंबा भोसले, वय 39 वर्षे, रा. ताकमोडवाडी ता. परंडा यांना नमुद आरोपींनी तुझा चुलत भाउ नकुल भोसले याची पत्नी पळून गेल्याची केस पोलीस स्टेशनला करायची नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मनिषा व मुली स्वाती, नेहा चुलत भाउ नकुल भोसले हे भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषनाथ भोसले यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 5...
पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज पुणे, आकुर्डी (ता.१२) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये विद्यार्थ्यांनी 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम, या अनोख्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणे, हा यामागील मुख्य हेतू होता. या उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती प्रकाशझोतात आणली. याप्रसंगी महाराष्ट्रासोबत दिल्लीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जीआयएस विद्यालय त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत होते. त्यामुळे दोन राज्यांमधील संस्कृती, कला, भाषा इ. माहितीची देवाण-घेवाण झाली. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या आगळ्यावेगळ्या माहितीचा अतिशय मोकळेपणाने गप्पा मारत आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये विविध राज्यांमधील संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत होती. विद्यार्थ्यांनी विविध चित्...
Comments
Post a Comment