परंडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूलचा सलग 10 व्या वर्षी 100% निकाल


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र  (इ 10 वी ) बोर्ड  परीक्षेचा निकाल आज दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने लातूर  बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. 

परांडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूलचा निकाल  याही वर्षी 100%लागला व सलग 10 वर्षे 100%  निकालाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये कु आरती रामचंद्र पाटील  हिने *97.60%,*   गुण मिळवत प्रथम, राजनंदिनी राजकुमार गरड  हिने *96.29%* द्वितीय तर श्वेता दादासाहेब खोगरे  हिने *95.20* % गुण मिळवत शाळेतून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच शाळेतून 90%च्या पुढे गुण मिळवणारे एकूण *22* विद्यार्थी   आहेत. श्रीराम अशोक पवार -95.00%, श्रीनाथ नाभिराज खांडवे -93.60%, हर्षवर्धन अनिल लिमकर -93.40%, दिव्या कैलास गिरी -93.20%, कृष्णा लहू फले -93.20%, सुजल रवींद्र सपकाळ -93.00%, प्राची महादेव लांडगे -92.80%, श्रुष्टि धर्यशील लांडगे -92.60%, साहील रहेमातली शेख -92.40%, नम्रता राजेंद्र जाधव -92.00%, वेदिका विनायक पिंगळे -91.80%, कृष्णा कुबेर खैरे -91.80%, संजना राजेश तल्लापल्लीवार -91.40%, श्रावणी सुनील कोकाटे- -91.20%,  साकिब समीर पठाण -90.60%, सिध्दीका अयाज पठाण -90.60%, प्रशांत राऊ भोसले -90.60%, स्नेहल केशव मासाळ -90.60%,राणी औदुंबर गाडे -90.00% तर एकूण 76 विद्यार्थी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले होते, त्यापैकी,    विशेष प्राविण्य प्राप्त *63* विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त *11* तर द्वितीय श्रेणी *02* विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे.                                     शाळेचे  संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ राहुल पाटील, सचिव डॉ उदयसिंह पाटील, संस्थेच्या डायरेक्टर डॉ शिल्पा पाटील व प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचारी यांचे  अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न