परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
दि.17/06/23

परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल ९२.८५ % इतका लागला असून सेमी इंग्रजीचा 100%  निकाल लागला आहे.
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 196 होते त्यापैकी 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले एकूण विद्यार्थी 20, विशेष प्राविण्य मिळविलेले एकूण विद्यार्थी 68, प्रथम श्रेणीमध्ये 54 विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणीमध्ये 40 विद्यार्थी आहेत.
शाळेतून प्रथम क्रमांक  कुमारी वैष्णवी प्रदीप कोकाटे-96.20%, शाळेमधून द्वितीय क्रमांक कुमारी सानिका शिवाजी क्षीरसागर-95.80% व  कुमारी आदिती नाईकवाडी -95.80% व प्रशाले मधून तृतीय क्रमांक कु. करण रामचंद्र घोगरे-94.80% ,
कु. शिवतेज नलवडे-94%, कुमारी मोहिनी मेहेर 93%, कुमारी ऋतुजा हजारे 93%, कु.स्वप्निल चव्हाण-92.80%, कुमारी भाग्यश्री ओव्हाळ-92.40%, कुमारी मयुरी गोफणे-92.20%, कुमारी गौरी बोंबलट-92.20%, कुमारी वैष्णवी पाटील-92%, कु. शंभुराजे नलवडे-91.60%, कुमारी अंकिता नलवडे-91.40%, कुमारी स्नेहा नरसाळे-91.20%, कु. कृष्णा शिंदे-90.80%, कु. अजित कोकाटे-90.60%, कु. अमन मुजावर-90.40%, कु. ओम धनवे-90.20%, कुमारी संस्कृती कुलकर्णी-90.20% मार्क घेऊन यश मिळविले.

या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक  घाडगे आर .के. व प्रमुख पाहुणे डॉ. कुलकर्णी डी .आर. वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय , तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. अश्विनी शिंदे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय परंडा या होत्या.

सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.
 त्यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, पालक, बहुसंख्येने महिला पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ठाणांबीर मॅडम , सूत्रसंचलन श्री कोकणे एन. एस.यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री लोकरे बी.एम.यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न