आषाढी वारी साठी सिना कोळेगाव धरणातील पाणी सिना नदीत सोडण्याची मागणी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १९ जून २०२३
अषाढीवारी च्या पालखी सोबत आलेल्या भाविकासाठी दि १९ जुन ते २४ जून रोजी पर्यंत सिना कोळेगाव धरणातील पाणी सिना नदीत सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिध्देश्वर पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे ,
दि १९ जून रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एकनाथ महाराज ,ज्ञानेश्वर माऊली व भगवान बाबा यांच्या पालख्या परंडा येथून ,मुगशी, पिठापुरी , कपिलापुरी , करंजा , नाडी , शिंगेवाडी , अवारपिपरी , लहू लोहारा , मार्ग पंढरपुर कडे रवाना होतात . या पालखीत हजारो भावीक दरवर्षी सहभागी होत असल्याने पाण्याची आवश्यकता आहे ,
या वर्षी अद्याप पाऊस पडला नसल्याने या भागातील सर्व नदया आटल्या आहे , तरी भावीकांना आंघोळीच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून दि १९ ते २४ जून पर्यंत पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे ,
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती जयकुमार जैन
रणजित पाटील , अंकुश डांगे, संजय गोफणे , रोहिदास गोफणे , तुषार गोफणे , उमर मुजावर , संजय कदम , आब्बास मुजावर , रफीक मुजावर , प्रशांत गायकवाड , भालचंद्र पाटील
जरीचंद गोडगे याच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते ,
Comments
Post a Comment