नांदगाव आगरामध्ये उभ्या एसटी बसला भीषण आग मात्र सुदैवाने जीवित हानी टळली
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)
नांदगाव आगराच्या बस स्थानकामध्ये दिनांक 24 जून रोजी शनिवारी सायंकाळी उभ्या बसणे अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत एसटी बस संपूर्णपणे जळून खाक झाली. परंतु जीवित हानी झाली नाही.
वायरिंगच्या शॉर्ट सर्किट मुळे सदरची बस पेटली असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला.
एसटी बसला आग लागल्या प्रसंगी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध न झाल्याने ही मोठी नुकसान नांदगाव आगराला सोसावे लागले.
बस स्थानकातून प्रवासी सोडून लगेच डेपोत जाणार असल्याने बस स्थानकापासून या काही अंतरावर उभी केली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. दरम्यान सदर बस ही साडेसहा वाजता चाळीसगाव येथून नांदगाव येथे आली होती. या बसमधील सुमारे वीस प्रवासी नांदगाव बस स्थानकावर बस मधून खाली उतरल्यानंतर अवघ्या काही दहा मिनिटात बस पेटली
एसटी डेपोचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीने बस विझविण्यात आली. तोपर्यंत बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे घटनेस्थळी दाखल झाले. यादरम्यान नांदगाव मनमाड पालिकेला अग्निशमनच्या बंबास पाचरण केले तेव्हा एक तासाने मनमाडचा अग्निशमन बंब दाखल झाला
Comments
Post a Comment