माणिकपुंज येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेला दोन वर्षापासून पाच शिक्षकांची रागा रिक्त

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
दि १७ जून 
नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) 

संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या असून पालक आपापल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करतात. परंतु नांदगाव तालुक्यातील माणिक येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यत वर्ग आहेत. 

 दोन वर्षापासून या शाळेला पाच शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत 

  या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने, विद्यार्थ्यांच्या  पालकांनी व स्थानिक शिक्षकांनी याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करून देखील दोन वर्षात दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची गळती होऊ लागली आहे. पालक आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत दाखल करीत आहेत. या बाबींना शिक्षण विभागाची मूक संमती असल्याचा आरोप माणिकपु़ज येथील पालक आरोप करतात.

   नांदगाव शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या माणिकपुंज येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेवर इयत्ता पहिली ते आठवी वर्ग असून 322 विद्यार्थी शिक्षण या शाळेमध्ये घेतात. 150 मुलींचा समावेश आहे. येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची गरज असताना येथे फक्त तीन शिक्षक आहेत. पाच शिक्षकाच्या जागा रिक्त असल्याची  तक्रारी करून  मागणी दोन वर्षापासून करीत असून नांदगाव पंचायत समितीच्या तालुका शिक्षण विभाग या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला. 

  शिक्षक  द्यावे अन्यथा माणिकपूर शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालक, शाळा व्यवस्थापक समिती माणिकपुंज यांनी दिला आहे.

 [] दोन वर्षे झाले आम्हाला शिकवायला शिक्षक मिळत नाही. भवितव्याचे काय? असा सवाल चिमुकल्या विद्यार्थिनींनी केला
  वैष्णवी संजय कोल्हे विद्यार्थिनी इयत्ता सातवी,

[]दोन वर्षात वेळोवेळी मागणी केली पण शिक्षण विभाग नांदगाव हे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थी खाजगी शाळेत दाखल होत आहे. याला शिक्षण विभाग जबाबदार आहे
       धर्मनाथ आव्हाड शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष माणिकपुंज

    [] शिक्षण विभागाच्या वरिष्ठांना पत्र व्यवहार केलेले आहे. पण अजून शिक्षक मिळत नाही ‌
     संजय भास्कर देसले मुख्याध्यापक माणिकपुंज

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न