आषाढी वारी साठी सिना कोळेगाव धरणातील पाणी सिना नदीत सोडा - मुंगशी ग्रामपंचायत ची मागणी


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
दि १९ जून २०२३
अषाढीवारी च्या पालखी सोबत  आलेल्या भाविकासाठी  सिना कोळेगाव धरणातील पाणी सिना नदीत सोडण्यात यावे अशी मागणी मुंगशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता सिनाकोळेगाव प्रकल्प यांच्या कडे करण्यात आली आहे ,

दि १९ जून रोजी कार्यकारी अभियंता व तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि २२ जून रोजी संत एकनाथ महाराज यांची पालखी माढा तालूक्यातील मुंगशी गावामध्ये दाखल होत आहे ,

या पालखी मध्ये १० ते १५ हजार वारकरी सहभागी होत असल्याने आंघोळ तसेच कपडे धुने  साठी पाण्याची गरज असल्याने सिनाकोळेगाव धरणातील पाणी सिना नदीत सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे ,

यावेळी निवेदन देताना मारुती जगताप, हनुमंत महाडीक ,समाधान जगताप, रोहिदास मोरे ,बंडू जगताप ,भैरवनाथ मोरे ,विक्रम काळे, बाबुराव जगताप, महादेव महाडिक ,रामलिंग धनाने, सागर लोंढे ऋषी सुरवसे उपस्थित होते ,

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न