आसू च्या उप सरपंच कालिंदा जगताप यांनी शब्द पाळला ,आडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने उप सरपंच पदाचा स्वमर्जीने राजीनामा ,
आडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने उप सरपंच पदाचा स्वमर्जीने राजीनामा ,
सरपंच व उप सरपंच यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल सर्वांच्या सम्मत्तीने ठरल्याची माहिती ,
ठरल्या प्रमाणे सरपंच राजीनामा देणार का गावाचे लक्ष ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा
परंडा ( दि ८ ) सर्व सदस्यांच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने परंडा तालूक्यातील आसू ग्रामपंचायत च्या उप सरपंच कालिदा जगताप यांनी दि ७ जुलै रोजी उप सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे ,
राजीनामा देऊन उप सरपंच यांनी शब्द पाळला आहे त्याच प्रमाणे सरपंच राजीनामा देऊन शब्द पाळतील का या कडे संपुर्ण गावाचे लक्ष लागले आहे ,
उप सरपंच यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याची माहिती त्यांचे पुत्र अमोल जगताप यांनी दिली आहे ,
आसू ग्रामपंचायत च्या निवडणूकीत महाविकास आघाडी (राष्ट्रवादी, शिवसेना,काँग्रेस,आर.पी.आय व इतर मित्र पक्ष) या सर्वांनी मिळून 2020-21 ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती
या निवडणुकीत महालिंग राया पॅनलचे सर्व 9 उमेदवार निवडून आले होते. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते व नूतन ग्रा.प.सदस्य ,कार्यकर्ते या सर्वांची सरपंच व उपसरपंच निवडीसाठी मा.जी.सदस्य मारुती मासाळ यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले होते
चर्चा, विनिमय, करून सरपंच व उपसरपंच हे अडीच-अडीच वर्षांसाठी नेमून चौघांना संधी देण्याचे सर्वानुमते ठरले त्यानुसार पहिल्या अडिच वर्षासाठी सरपंच म्हणून अनिता महालिंग राऊत तर उपसरपंच म्हणून कालिंदा रमेश जगताप यांच्या नावाची निवड करण्यात आली होती ,
सरपंच व उप सरपंच यांच्या नावाला या बैठकी मध्ये चत्रगुण जाधव,मारुती मासाळ, पटेल सर , हनुमंत मारकड ,विश्वास माने,माजिद पटेल,बिभीषण खुणे यांनी सर्व सदस्य व कार्यकर्त्यांसमोर ग्रामदैवत महालिंगरायांचा भंडारा लावून घोषणा केली त्यास सर्वांनी टाळ्या वाजवून सहमती दिली होती ,
त्या नुसार सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी पार पडल्या होत्या ,सरपंच उप सरपंच पदाचा ठरल्या प्रमाणे अडीच वर्ष पुर्ण झाल्याने उपसरपंच सौ कलिंदा रमेश जगताप यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे ,
तसेच उपसरपंच पदावर काम करण्याची संधी दिल्याने ग्रामस्थांचे व सदस्यांचे अभार मानले
Comments
Post a Comment