नांदगाव तालुक्यातील वृंदावन हॉटेलवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)
नांदगाव शहरापासून जवळपास असलेल्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील नाग्यासाक्या धरणालगत असलेल्या वृंदावन हॉटेलवर पोलिसांनी दि १ ऑगष्ट रोजी धाड मारून देहव्यापार केल्या प्रकरणी कारवाई केली आहे
नांदगाव तालुक्यातील सगळ्यात मोठे सेक्स रॅकेट चा पर्दाफाश करणे कामी नाशिक पोलिसांनी सापळा रचून मोहीम फत्ते केली. नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारात गेली पाच ते सहा वर्षांपासून देह विक्री व्यवसाय राजरोसपणे खुले आम सुरळीत चालू होता
नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी यांच्या पथकाने हॉटेल वृंदावन येथे दिनांक एक ऑगस्ट 2023 रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता एक डमी गिराईक बनवून पाठविले होते
वृंदावन हॉटेल चालक यांच्यासह पीडित महिला यांना पोलिसांनी पकडले व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे
पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधीक्षक सोहल शेख, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक SP पोलीस पथकातील PSI अंकिता बाविस्कर, पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, नितीन डावकर, पोलीस शिपाई रामराजे, महिला पोलीस शिपाई मनीषा कुंझरे यांच्या पथकाने कारवाई केली.
Comments
Post a Comment