पत्रकार संरक्षण कायद्याची होळी, तहसील कार्यालयासमोर निदर्शने, पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमल बजावणीची मागणी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १७ ऑगष्ट २०२३
नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-
महाराष्ट्र राज्यांमध्ये पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायदा हा कुचकामी ठरत असून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात हुतात्मा चौकामध्ये मराठी पत्रकार परिषद पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा पत्रकार कायदा आणखी कडक करावा तसेच कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
यावेळी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार, सदस्य उपस्थित होते
Comments
Post a Comment