पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या वतीने दिलेल्या डिजिटल बोर्डच्या प्रशिक्षणास सुरुवात.
परंडा मतदार संघातील १३०
शाळेत सावंत यांच्या स्वखर्चाने डिजिटल बोर्ड पुरवठा ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद चे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या वतीने परंडा-भुम,वाशी विधान सभा मतदार संघातील शासकीय व खाजगी अशा १३० शाळांना ३ कोटी २५ लाख रुपये स्वखर्चातून डिजिटल बोर्ड देण्यात आले आहे
शाळांना दिलेल्या डिजिटल बोर्ड हाताळन्याचे प्रशिक्षणाचा शुभारंभ पुण्यातील तंज्ञा कडून शुक्रवार दि १८ ऑगष्ट रोजी परंडा येथिल महत्मा गांधी विद्यालयात करण्यात आले ,
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर के घाडगे, उपमुख्याध्यापक बी एम लोकरे, आरोग्य दूत बालाजी नेटके, धनंजय खैरे आदी उपस्थित होते. या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये येथील शिक्षकांना पुणे येथील प्रा सचिन गटकुळ, प्रा अनिल नायकवडी, प्रा शुभम राजमाने या तज्ञांनी डिजिटल बोर्ड कशा पद्धतीने हाताळायचा व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ज्ञानदान करावयाचे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून भूम, परंडा वाशीच्या शाळांमध्ये देण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट बोर्ड च्या प्रशिक्षणाला दि. १७ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून हे प्रशिक्षण शिबिर १९ ऑगस्ट असे तीन दिवस सुरू राहणार आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा भूम वाशी तालुक्यातील १३० शासकीय व खाजगी शाळांसाठी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये स्वखर्चातून डिजिटल बोर्ड दिले आहेत. मात्र संबंधित शाळेतील शिक्षक प्रशिक्षित नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही डॉ सावंत यांनी उचलली असून, त्या दृष्टिकोनातून या तिन्ही तालुक्यात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिली
Comments
Post a Comment