विद्यार्थाना शिकविण्या व्यतीरीक्त लादलेल्या कामाच्या विरोधात शिक्षकांचे काळ्याफीती लाऊन केले कामकाज.
विद्यार्थाना शिकविण्या व्यतीरीक्त लादलेल्या कामाच्या विरोधात शिक्षकांचे काळ्याफीती लाऊन केले कामकाज.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा [ दि५ सप्टेबंर ] शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे बंद करावे या मागणी साठी परंडा तालूक्यातील जिल्हा परिषद शाकेच्या प्राथमीक, माध्यमीक शिक्षकांनी दि ५ सप्टेबर रोजी शिक्षण दिनी काळया फिती लाऊन काम केले ,
आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या "अशी भावनिक हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शासणाकडे केली आहे ,
शिक्षकांना मतदार नोंदणी करणे,जनगणना,निवडणूक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची वेळोवेळी मागितलेली माहिती, तसेच ऑनलाईन ॲप्स, यासारखी जवळजवळ ७० ते ७५ कामे शिक्षकावर लादन्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व अशैक्षणिक कामामुळे परिणाम होताना दिसत आहे.
वेळोवेळी मोर्चे,आंदोलने करून सुद्धा या अशैक्षणिक कामांचा बोजा कमी केलेला नाही.म्हणून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या दिवशी राज्यभरातील शिक्षकांनी काळ्याफिती लावून शासनाकडे आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे.याची दखल राज्य शासनाने लवकरात लवकर घेऊन शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा आणि खऱ्या अर्थाने ज्या हेतूसाठी शिक्षकाची नेमणूक असते तो म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिकवण्याचेच काम फक्त शिक्षकांना करू द्यावे ही अपेक्षा शिक्षकातून व्यक्त होत आहे.
शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शना खाली,राज्याचे अध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वात, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे,जिल्हा नेते एल बी पडवळ,सुधीर वाघमारे,विठ्ठल माने श्रीनिवास गलांडे,रविंद्र कापसे यांच्या आवाहनानुसार तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे,प्रसिद्धीप्रमुख शिवाजीराव पंडित यासह तालुक्यातील सर्व शिक्षक संघ पदाधिकारी व शिक्षक संघ शिलेदारांच्या सहकार्यातून काळ्याफीती लाऊन कामकाज करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
Comments
Post a Comment