माजी सैनिक संघटनेची परंडा तहसिल कार्यालयान बैठक संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १४ सप्टेबर २०२३
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
परंडा तहसील कार्यालय येथील सभागृहात तालुक्यातील माजी सैनिकांच्या अडी-अडचणीचे विषय समजून घेण्यासाठी नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव व जिल्हा सैनिक कार्यालयाचे सुधाकर पारसे यांच्या उपस्थितीत माजी सैनिक संघटनेच्या पुढाकाराने गुरुवारी बैठक संपन्न झाले.
परंडा तालुक्यात १६८ माजी सैनिकांची नोंद जिल्हा माजी सैनिक कार्यालयाकडे झाली आहे. माजी सैनिकांच्या सर्व समस्याचे निवारण होण्यासाठी या बैठक आयोजित केली होती. तालुक्यातील टाकळी येथील शहीद जवान वामन पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यात आली.वीरपत्नी वैशाली पवार या बैठकीस आवर्जून उपस्थित होत्या.प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी माजी सैनिकांच्या समस्या निवारण होण्यासाठी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले जाते. नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव व जिल्हा सैनिक कार्यालयाचे सुधाकर पारसे यांनी माजी सैनिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी सैनिक संघटना परंडा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडवे, उपाध्यक्ष विकास चौधरी , सचिव महावीर तनपुरे,लक्ष्मण बारस्कर, बापुसाहेब गायकवाड, मधुकर बिडवे, संजीवन शिंदे, हरी यादव, नितीन नवले, मारुती कांबळे, संतोष सुर्यवंशी, ओंकार जगताप, बिभिषण भोसले, भास्कर हांगे, विश्वनाथ रामगुडे, ज्ञानेश्वर हांगे, कुडलिंक चौधरी, संदीप कसाब, हनुमंत घोगरे, शहाजी गडदे, अभिमान यादव, देविदास गरड यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment