वगळलेल्या महसुल मंडळातील शेतकर्यांना २५ टक्के अॅग्रीम पिकवीमा द्यावा ; अन्यथा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचा निवेदना द्वारे ईशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि २६ सप्टेबर २०२३) तालुक्यातील वगळलेल्या महसुल मंडळातील शेतकर्यांना २५ टक्के अॅग्रीम पिकवीमा मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती तातडीची कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा परंडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे ,
माजी आमदार राहूल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि २६ रोजी
तहसिलदार परंडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,जिल्हाधिकारी यांनी २५ टक्के अॅग्रीम पिकवीमा मिळण्यासाठी वगळलेल्या १७ महसुल मंडळाचा समावेश करून त्या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम एक महिन्याच्या आत देण्यात यावी . अशी अधिसुचना दि . १५ सप्टेंबर रोजी विमा कंपनीला काढली होती. परंतु विमा कंपनीकडुन अधिसुचना विमा कंपनीने अमान्य केलेली आहे. अशी माहिती समोर आलेली आहे.
विमा कंपनीचे पत्र यासोबत जोडले आहे.या सर्व प्रकारामुळे परंडा ,भुम व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून प्रत्यक्षात मोठे नुकसान झालेले असुन सुध्दा विमा कंपनीने जिल्हाधिकारी धाराशिव यांची अधिसुचना अमान्य करत असेल तर हे शेतकऱ्यांवर अन्याय आहे.यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झालेला आहे. विमा कंपनीच्या या चुकीच्या धोरणामुळे अडचणीच्या काळात शेतकर्यांना मिळणार्या मदतीसाठीच अडचण निर्माण झालेली आहे.
तरी या वगळलेल्या महसुल मंडळातील शेतकर्यांना २५ टक्के अॅग्रीम पिकवीमा मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती तातडीची कार्यवाही व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅड.संदीप पाटील , बाणगंगा साखर कारखाना संचालक धनंजय हांडे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, बाजार समिती उपसभापती संजय पवार , संचालक अॅड. सुजित देवकते , अॅड. आमोल करळे , विश्वास मोरे , अॅड. सुहास पाटील , रा. युवक काँ . ता . उपाध्यक्ष बंडू रगडे ,आश्रू लेंगरे , प्रा.शरद झोंबाडे , प्रा .शफील पटेल , दत्ता कातुरे , लक्ष्मीकांत बनसोडे , नसीर शहाबर्फीवाले , जावेद पठाण , खय्युम तुटके , नंदू शिंदे , श्रीहरी नाईकवाडी , गणी हावरे , नागनाथ थोरात , धनंजय पाडूळे , काशीनाथ वळेकर , दत्ता रगडे , सलीम शेख , हनुमंत शिंदे , पांडूरंग मिसाळ , शंकर गटकुळ , सतीश कांबळे , जयसिंग पाटील , मुरलीधर मोहरे , आबु पटेल , रमेश बोबडे , तेजस मिसाळ , श्रीमंत गंभीरे आदि उपस्थित होते .
Comments
Post a Comment