मुंबई सह मोठया शहरा साठी लांब पल्याच्या बस सुरू करा, अन्यथा आंदोलन शिवसेनेची परंडा अगार प्रमुखाला निवेदनाद्वारे इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ८ )
परंडा एस टी बस आगारातील बंद पडणाऱ्या जुन्या बस बदलून प्रवाश्यांची गैरसोय दुर करावी व मुंबई सह मोठया शहरा साठी लांब पल्ल्याच्या बस सुरू करावी अशी मागणी
ठाकरे गट परंडा शहर शिवसेनेच्या वतीने दि ८ सप्टेबर रोजी परंडा आगार प्रमुख यांच्या कडे करण्यात आली आहे , मागणी मान्य नाही झाल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे ,
आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा आगारातील जुन्या गाड्या प्रवासा दरम्यान बंद पडत आहेत या मुळे प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात गैर सोयीचा सामना करावा लागत आहे ,
प्रवाश्यांच्या प्रश्ना कडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे तरी आपण या प्रकरणी तात्काळ पाठपुरावा करून परंडा आगारातील जुन्या बस बदलून नवीन बस परंडा बस आगारात दाखल करावे ,
तसेच मुंबई , हैदाबाद , रत्नागिरी , शिर्डी या शहरा साठी बस सेवा चालू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , जर्नाधन मेहेर , डॉ. अब्बास मुजावर , राफिक मुजावर , तुकाराम गायकवाड , उमेश परदेशी , कुणाल जाधव , तय्यब मुजावर , अहेमद भोले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment