परंडा तालुक्यांत ट्रिगर-टु लागु करूनदुष्काळ जाहीर करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादीचा इशारा

मागणी मान्य नाही झाल्यास अंदोलनाचा इशारा 

परंडा ( दि १९ ) पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

परंडा तालुक्यात ट्रिगर-टु लागु करून
दुष्काळ जाहीर करन्यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा परंडा तालूका राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने देण्यात आला आहे 

गुरूवार दि १९ ऑक्टोबर रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रा मध्ये
महा-मदत या प्रणालीद्वारे मुल्यांकन करून काही तालुक्यांना ट्रिगर -टू लागू करून दूष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. 
परंतु यामध्ये परंडा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला
नाही. वास्तविक पाहता खरीप हंगाम २०२३ मध्ये पावसाळा सुरू असुनही सरासरीच्या ४० टक्के सुध्दा पाऊस झालेला नाही. याचा जबर फटका खरीप हंगामाला तर बसलेला
आहे,तसेच रब्बी हंगाम सुध्दा संकटात सापडलेला आहे. परंडा तालुक्या मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा खंड, जमीनीतील पाणी पातळीमधील घट, पिकपेरा
व अपेक्षीत उत्पन्नात ५० टक्के पेक्षा जास्त घट, जनावरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न,पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणी पुरवठा होणा-या जलस्त्रोतांची सद्यस्थिती या सर्वच
गोष्टींची परिस्थिती खुप गंभीर असुन, परंडा तालुक्यांस ट्रिगर-टु लागु होऊन दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. 
त्यामुळे येथील शेतक-यांना येणा-या काळात NDRF व
SDRF च्या निकषानुसार मदत मिळु शकेल. त्यामुळे परंडा तालुक्यात ट्रिगर-टु लागु
करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अन्यथा  राष्ट्रवादी च्या वतीने तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे ,
निवेदनावर तालूका अध्यक्ष अडवोकेट संदीप पाटील , नंदू शिंदे एडवोकेट सुभाष वेताळ ,सलीम हान्नुरे लक्ष्मीकांत बनसोडे ,जावेद खान पठाण ,श्रीहरि नाईकवाडी ,बाळू गोफने ,विनोद कांबळे, आबासाहेब पाटील, सुहास पाटील, गणेश जाधव, अशोक जाधव वसंत जगताप रामभाऊ जामदारे , राजेंद्र जगताप, अमोल करळे ,अडवोकेट एस बी देवकते गनी हावरे गणे हावरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न