राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक पदी शिवाजी येवारे यांची नियुक्ती..
परंडा [ दि२८डिसेंबर ] परंडा येथील शिवाजी येवारे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सुचनेने शिवाजी येवारे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाजी येवारे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश संघटकपदी नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे परंडा,भूम,वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सावता परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष बापु शिदे, तालुकाध्यक्ष आर्जून सायकर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष जावेद पठाण,राजु अलबते,धोडीराम मोहळकर, धनाजी अदलींगे,गणेश इतापे, बालाजी गायकवाड,राहूल वाघमारे उपस्थित होते.
Comments
Post a Comment