संत मीरा पब्लिक स्कूल परांडा येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात
संत मीरा पब्लिक स्कूल परांडा येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात*
परांडा, दि 16 फेब्रुवारी 2024 रोजी परांडा येथील संत मीरा पब्लिक येथे लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये इ. नर्सरी, ज्यु. के. जी व सी. के जी च्या 150 हुन अधिक चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बालकांनी डॉक्टर, वकील, शिक्षक, पुढारी, भाजीवाली, दूधवाला, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, झाशीची राणी , भगतसिंह, लोकमान्य टिळक, शेतकरी, महाराणा प्रताप इ अनेक प्रकारचे वेशभूषा केले होते. पात्राला साजेसे असे सवांद /डायलॉग विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या व प्रभावीपणे बोलून दाखवले. तसेच यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फिल्मी गिते, लोकगीते यावर अप्रतिम नृत्य करत उपस्थित लोकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभारत शाळेने व इतर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना '(बक्षीस वितरण) ' प्रमाणपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. अनंत अनभुले, चंद्रकांत सूर्यवंशी, सतीश मिस्कीन, मेजर सहदेव गिरवले, संदीप दैन, पंजाब घाडगे, सुजाता सालगुडे, बालाजी कांबळे, आयशा सय्यद, भाग्यश्री तनपुरे, दिव्या जाधव, प्रियांका बेडमुथा, अमृता शिंदे, चिमा घाडगे, पौर्णिमा तिवारी, रुबीना महाकले, प्रियंका जंगम, प्रा. उत्तम कोकाटे, नागेश डाके व बहुसंख्य पालक इ मान्यवर व सर्व विद्यार्थी होते.परीक्षक म्हणून माधुरी नांगरे व शुभांगी गोडगे यांनी काम पहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा गव्हाळे व विद्यार्थिनी समीक्षा टोम्पे यांनी केले. स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे संतोष शेरे, सुहास आगरकर,रोहिणी कुंभार, पूनम गायकवाड बालाजी गोरे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment