पुलाच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष , लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालन्याचा इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि १३ )
परंडा तालूक्यातील कुंभेफळ ,
जाकेपिपरी रोडवरील दुधना नदीवर पुल बांधकामाकडे प्रशासन दूर्लक्ष करीत असल्याने लोकसभा निवडणूकी च्या मतदानावर बहिष्कार घालन्याचा इशारा कुंभेफळ येथिल ग्रामस्थांनी दिला आहे
दि १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
निवेदनात म्हटले आहे की कुंभेफळ ते जाकेपिपरी रस्ता कच्चा असुन दुधणी नदीवर नळ्याचे पुल असल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहते या मुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करतात पुलावरील पाण्यातून जावे लागते , तसेच शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे ,
पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्याने मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे
निवेदनावर सरपंच कौशल्या राऊत अब्दुल पटेल , साबीर शेख , मरिबा गायकवाड , किशोर गायकवाड , योगेश आवाळे, आलीम बेग , रफीक बेग . मोतीराम भराडे, सर्जेराव सोनटक्के ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ,
Comments
Post a Comment