मला डॉक्टर व्हायचे आहे, शेतकऱ्याची मुलगी गौरी दबडेचे स्वप्न

मला डॉक्टर व्हायचे आहे, शेतकऱ्याची मुलगी गौरी दबडेचे स्वप्न 

बारावीत ८९.३३% गुण मिळवत कॉलेजमधून पटकवला द्वितीय क्रमांक.

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

परंडा [ दि २३ मे ] परंडा तालुक्यातील लोहारा येथील 
गौरी कल्याण दबडे हिणे १२वी परिक्षत८९.३३% गुण घेऊन कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांक पटकवत शेतकरी आई वडीलां च्या कष्ठाचे चिज केले आहे.
       परंडा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी कल्याण दबडे यांची कन्यां गौरी दबडे हिने १२ परिक्षत८९.३३ % गुण मिळवीले आहेत.गौरीचे दबडेचे १ ली ते ४ पर्यतचे शिक्षण लोहारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर ५ ते १० पर्यतचे शिक्षण कपिलापुरी येथील स्व. कल्याणराव भातलंवडे विद्यालयात झाले आसुन तीने इत्ता १० बोर्ड परिक्षत ९२ % गुण मिळवले होते.तर ११ वी १२ वीचे शिक्षण आकलुज येथील श्रीराम कनिष्ठ विद्यालय पाणीव येथे झाले आहे. 
        गौरी च्या घरची परिस्थीती 
जेम तेम बेताची आसुन वडील शेतीचा व्यावसाय सांभाळत शेतीला जोड धंदा म्हणूण परंडा शहरात फेब्रीकेशनचा व्यावसाय करत आहेत तर आईने घर व शेती काम करून पहिली पासुनच अभ्यासात हुशार आसलेल्या गौरी वर आपल्या सारखे कष्ठ करण्याची वेळ येऊनये म्हणूण गौरीला शिक्षणा साठी आर्थीक खर्च कमी पडू द्यावयाचा नाही या जिद्दीने दोघांनी तीचे शिक्षण चालु ठेवले . 
         आई वडीलांच्या कष्टाचे चीज करत लोहारा येथील गौरी दबडे या विद्यार्थिनीने मोठ्या जिद्दीने अभ्यास करून बारावी परीक्षेत ८९.३३ टक्के गुण घेत पाणीव अकलुज येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. 
      गौरी दबडे हिने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे विविध स्तरातून, लोहारा गावातून कौतुक व्यक्त होत आहे.

मला डॉक्टर व्हायचे आहे 

एका छोटयाश्या गावात शेतकऱ्या घरात जन्मलेल्या गौरी दबडे हिला डॉक्टर व्हायचे स्वप्न असुन  , डॉक्टर झाल्यावर गोर गरीब जनतेची सेवा करायची इच्छा असल्याचे गौरी हिने म्हटले आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न