संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ चे अनुदान DBT पोर्टल द्वारे होणार , कागपपत्र जमा करण्याचे अवाहन

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ चे अनुदान DBT पोर्टल द्वारे होणार ,

बॅक पासबुक , आधारकार्ड , मुत्यू प्रमाणपत्र , अपंग प्रमाणपत्राचे झेरॉक्स जमा करण्याचे अवाहन ,

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 


परंडा ( दि २४ मे २०२४) संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या तालुका परंडा मधील लाभार्थ्याना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांचे आदेशानूसार सदरील लाभार्थ्याना अर्थसहाय्याचे वितरण डी. बी. टी. पोर्टलव्दारे करावयाचे आहे.
तरी सदरील पोर्टलसाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा
राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी यांचे
1. आधार कार्ड झेरॉक्स,
2. ज्या खात्यावर पगार चालु आहे ते पासबुक झेरॉक्स ( पासबुक नंबर स्पष्ट दिसावा) 3.मोबाईल नंबर (लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा कुंटुबातील कोणत्याही व्यक्तीचा आधारकार्ड झेरॉक्सवर लिहावा),
4. लाभार्थी अपंग असेल तर अंपगाचे ओळखपत्र / सर्टीफिकेट झेरॉक्स
5. विधवा असेल तर पतीचे मृत्यु प्रमाणपत्र झेरॉक्सची आवश्यकता आहे.
तरी लाभार्थ्यानी सदरील कागदपत्रे आपले तलाठी कार्यालयात किंवा तहसिल कार्यालय परंडा येथे संगायो विभागात कार्यालयीन वेळेत दिनांक 27/05/2024 ते 31/05/2024 या कालावधीत दयावे. लाभार्थ्यानी स्वतः येणे बंधनकारक नाही.
प्रतिनिधी मार्फत कागदपत्रे पाठवू शकता.
सदरील सुचना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजने (DRD) च्या लाभार्थ्याना
लागु नाही. याची नोंद घ्यावी. असे अवाहन तहसिलदार यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश