पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित पवार साहेब यांचा वाढदिवस पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, आकुर्डी येथे उत्साहात साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित पवार साहेब यांचा वाढदिवस पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, आकुर्डी येथे उत्साहात साजरा

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

पुणे,आकुर्डी (ता.२२) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ व अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डी येथे विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल रॅलीचे भव्य आयोजन शनिवारवाडा, पुणे येथे करण्यात आले होते. यामध्ये इंग्रजी माध्यम आकुर्डीचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त शाखा पातळीवरही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन तसेच विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी औषध वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले. चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा.तौहिद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन पाहून त्यांनी मुलांच्या कलागुणांना कौतुकाने दाद दिली व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी कलादालनामध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या तसेच चित्रांचे रेखाटन करून सुंदर प्रदर्शन भरवले होते. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त अशा औषधी झाडांचे रोपण केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात प्लास्टिक वस्तूंचे संकलन केले व भविष्यात प्लास्टिक वापरणार नाही असा निर्धार केला. रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण करून त्यातून तीन क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्या प्रिती दबडे व कला शिक्षिका विद्या गजरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिक्षिका मीना नाचोणकर यांनी केले व प्रदर्शनासाठी मार्गदर्शन कलाशिक्षिका विद्या गजरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या प्रिती दबडे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभागातील सदस्य विद्या गजरे,ज्योती बोंद्रे, रेखा रोकडे, मंदार देसाई यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न