वाशी तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये तेरखेडा गणेश विद्यालय ची पुन्हा बाजी,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
वाशी येथे तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये गणेश विद्यालय तेरखेडा प्रशालेचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी समर्थ सचिन उकरडे याने 35 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
समर्थ याने मिळवलेल्या यशा बद्दल प्रशालेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक बोन्दर यांनी समर्थ याचा सत्कार केला.
व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी त्याचे आजी व आजोबा उपस्थित होते. व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment