दि २० ऑगष्ट रोजी होणारी होमगार्ड भरती प्रक्रीया पावसा मुळे पुढे ढकल्यात आली ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १९ ऑगष्ट्र २०२४
धाराशिव जिल्हयातील दि २० ऑगष्ट रोजी होणारी होमगार्ड भरती प्रक्रीया पावसा मुळे पुढे ढकल्यात आली असल्याची माहिती जिल्हा होमगार्ड कार्यालया चे केंद्र नायक कोकरे यांनी दिली आहे
धाराशिव जिल्हा होमगार्ड तर्फे धाराशिव जिल्हयातील पथक- धाराशिव, कळंब, भूम परांडा, उमरगा, तुळजापूर व उप-पथक येडशी या पथकातील पुरुष व महिला अनुशेष भरून काढण्यासाठी नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करीता
https://maharashtraedhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेत स्थळावर फक्त इंग्रजी भाषेतुन दिनांक 25/07/2024 ते 16 / 08 / 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
तरी अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करीता दिनांक 20/08/2024 ते 24/08/ 2024 या कालावधीत दररोज सकाळी 05:30 वाजता पोलीस मुख्यालय, धाराशिव येथे बोलविण्यात आले होते.
परंतु धाराशिव येथे अतिवृष्टी झाल्या कारणाने सदरची नावनोंदणी ( भरती) 2024 प्रक्रीया पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. तरी आपणास पुढील दिनांक व वेळ https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेत स्थळावर लवकरच कळविण्यात येईल.
Comments
Post a Comment