होमगार्ड भरती प्रक्रीया तारखा जाहिर दि २२ ते २६ ऑगष्ट
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २० ऑगष्ट २०२४
धाराशिव जिल्ह्यातील होमगार्ड भरती प्रक्रीयाची तारखा जाहिर करण्यात आल्या असुन दि २२ ऑगष्ट ते २६ ऑगष्ट रोजी पर्यंत उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे ,
पावसा मुळे दि २० ऑगष्ट रोजी पासुन होणारी भरती प्रक्रीया रद्द करण्यात आली होती ,
पावसाने उघडीप दिल्याने दि २२ ऑगष्ट ते २६ ऑगष्ट या पाच दिवसाच्या कालावधी मध्ये भरती प्रक्रीया केली जानार आहे ,
धाराशिव जिल्हा होमगार्ड तर्फे धाराशिव जिल्हयातील पथक धाराशिव, कळंब, भूम, परांडा, उमरगा, तुळजापूर व उप-पथक येडशी या पथकातील पुरुष व महिला अनुशेष भरून काढण्यासाठी नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करीता दिनांक 25/07/2024 ते 16/08/ 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करीता दिनांक 22 ऑगष्ट ते 26 ऑगष्ट 2024 या कालावधीत दररोज सकाळी 05:30 वाजता खालील प्रमाणे पोलीस मुख्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे ,
उमेदवारांना सकाळी 05:30 ते 10:30 या कालावधी मध्ये मैदानात प्रवेश दिला जाईल ,
दि 22 ऑगष्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 1428, (फक्त पुरूष उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे
तर दिनांक 23 ऑगष्ट रोजी
नोंदणी क्रमांक 1429 ते 2906 पर्यंत नोंदणी असलेल्या पुरूष उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
दिनांक 24/08/2024 रोजी , नोंदणी क्रमांक 2907 ते 4366 पर्यंत च्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
तर दि 25 ऑगष्ट रोजी ,नोंदणी क्रमांक 4367 ते 5823 पर्यंत नोंदणी असलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
तर दिनांक 26 रोजी
फक्त महिला उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे
सदर नोंदणी फक्त धाराशिव जिल्हयातील रहीवासी उमेदवारांकरीता असुन इतर जिल्हयातील ऑन लाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणी करीता अपात्र ठरवण्यात येतील. त्यामुळे धाराशिव जिल्हा सोडुन इतर जिल्हयातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरीता उपस्थित
राहु नये.असे अवाहन केले आहे,
कागदपत्र पडताळणी व शारिरीक क्षमता चाचणी करीता येताना ऑनलाईन अर्जासह कागदपत्राच्या आवश्यक छायांकित प्रती उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करुन अर्जासोबत जोडावे. नोंदणीच्या दिवशी अर्ज स्वतः उमेदवाराने घेवुन यावे. तसेच एन.सी.सी.बी व सी प्रमाणपत्र, आय. टी. आय. जिल्हा स्तरीय क्रिडा मध्ये प्राविण प्राप्त (प्रथम, व्दितीय व तृतीय), जड वाहन चालक परवाना धारक व इतर अन्य तपशिलाच्या पृष्टयार्थ सर्व संबंधीत मुळ प्रमाणपत्र व नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो नोंदणी वेळी सादर करणे बंधनकारक असेल. उमेदवारास नोंदणीच्या टिकाणी स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी प्रवासात काही अपघाती घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत उमेदवाराची राहील.
२. उमेदवारांना शारिरीक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणे करीता प्रत्येक चाचणीमध्ये ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील ( धावणे या चाचणीमध्ये किमान १० गुण व गोळाफेक या चाचणीमध्ये किमान ४ गुण आवश्यक)
३. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी वेळी कोणत्याही किमती वस्तु मोबाईल इ. आणु नयेत, गहाळ झाल्यास याची कोणतीही जबाबदारी आयोजकांवर राहणार नाही. धावणे चाचणी मध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही.
4. मात्र धावणे चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांना त्यांच डिटेल सोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल व छाती क्रमांक इ. जमा करावे लागले. मध्येच पळून गेलेल्या उमदेवारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
5. धावणे चाचणी ही पोलीस मुख्यालयाच्या मैदानात घेण्यात येणार असून अतिवृष्टी झाल्यास धावणे चाचणी ही रोडवर घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदर होमगार्ड नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व इन- कॅमेरा पार पाडण्यात येणार असून होमगार्ड नोंदणी करीता उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. तसचे शिफारस / वशिल इ. गैरमार्गाचा वापर करू नये. होमगार्ड नोंदणी करीता कोणी पैसे / लाचेची मागणी केल्यास तात्काळ मा. अप्पर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड धाराशिव किंवा अधिक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालय, धाराशिव यांचेकडे तक्रार करावी.
या
अतिव ष्टीमुळे वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याची सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php संकेतस्थाळवर वेळोवेळी देण्यात येईल त्यामूळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सुचनांकरीता अदयावत / सतर्क राहावे.
Comments
Post a Comment