ज्या उमेदवारांचे होमगार्ड व पोलिस भरतीची तारीख २२ ऑगष्ट ते २५ ऑगष्ट दरम्यान असेल त्यांना सवलत देणार ,जिल्हा होमगार्ड कार्यालया कडून घोषणा
जिल्हा होमगार्ड कार्यालया कडून घोषणा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २१ ऑगष्ट २०२४
धाराशिव जिल्ह्यातील ज्या उमेदवाराने पोलिस भरती व होमगाई भरती साठी दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल केला आहे अश्या उमेदवारांची निवड चाचणी दिनांक २२ ते २५ ऑगष्ट दरम्यान असल्यास त्यांची संधी हुकू नये या साठी धाराशिव होमगार्ड कार्यालयाने
दि २६ ऑगष्ट रोजी चाचणी साठी संधी उपलब्ध करून दिली आहे ,
अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारे माहिती दिली आहे ,
धाराशिव जिल्ह्यातील होमगार्ड भरती प्रक्रीयाची तारखा जाहिर करण्यात आल्या असुन दि २२ ऑगष्ट ते २६ ऑगष्ट रोजी पर्यंत उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहे
मुंबई येथे दि २२ ऑगष्ट रोजी पोलिस भरती साठी चाचणी घेण्यात येणार आहे या साठी जिल्हयातील काही उमेदवारांनी मुंबई किंवा ईतर ठिकाणी व धाराशिव येथील होमगार्ड या दोन्ही ठिकानी अर्ज दाखल केले असेल व त्यांची भरती प्रक्रीया दि २२ ते २५ ऑगष्ट दरम्यान येत असेल तर त्यांची संधी हुकू नये या साठी
पोलिस भरती साठी अर्ज केल्याचा पुरावा दाखल केल्यास अश्या उमेदवारांना दि २६ ऑगष्ट रोजी शेवटच्या दिवशी होमगार्ड चाचणी साठी संधी दिली जानार आहे याचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे ,
अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करीता दिनांक 22 ऑगष्ट ते 26 ऑगष्ट 2024 या कालावधीत दररोज सकाळी 05:30 वाजता खालील प्रमाणे पोलीस मुख्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे ,
दि 22 ऑगष्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 1428, (फक्त पुरूष उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे
तर दिनांक 23 ऑगष्ट रोजी
नोंदणी क्रमांक 1429 ते 2906 पर्यंत नोंदणी असलेल्या पुरूष उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
दिनांक 24/08/2024 रोजी , नोंदणी क्रमांक 2907 ते 4366 पर्यंत च्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
तर दि 25 ऑगष्ट रोजी ,नोंदणी क्रमांक 4367 ते 5823 पर्यंत नोंदणी असलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
तर दिनांक 26 रोजी
महिला उमेदवार व पोलिस भरती साठी अर्ज केलेल्या उमेदवार यांची चाचणी घेण्यात येणार आहे ,
Comments
Post a Comment