भूम परांडा वाशी येथिल पुणे रहिवासी, बांधवांचा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २५ आगष्ट २०२४
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री, तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, मराठा भुषण, शिवजल क्रांतीचे प्रणेते, भुम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत
भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील पुणे परिसरात राहाणाऱ्या बांधवांचा भव्य "कौटुंबिक स्नेह मेळावा" मोठ्या उत्साहात व आनंदात आज पिंपरी चिंचवड येथे पार पडला.
या कार्यक्रमास भूम परांडा वाशी येथील पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून गर्दी केली होती. यावेळी सावंत साहेबांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली. विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेली हि मंडळी आपल्या गावाचे आणि मातीचे संस्कार टिकवून आहेत, याचे समाधान वाटले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणात भूम परांडा वाशी येथील नागरिक वास्तव्यास आहेत. सर्वच भूम परांडा वाशी येथील बांधवांच्या गाठीभेटी आणि स्नेहबंधन मजबूत होणारा हा सोहळा आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा "भूम परांडा वाशी भूषण पुरस्काराने" आदरणीय आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब समर्थक, महाराष्ट्र राज्य व उद्योजक श्री.चंद्रकांत सरडे व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विजयशेठ जगताप, बाळासाहेब वाल्हेकर, नारायण बहिरवाडे, केशव घोळवे, चंद्रकांता सोनकांबळे, चंद्रकांत सरडे व पुणे व पिंपरी चिंचवड मधील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, उद्योजक व व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments
Post a Comment