गणेशोत्सवाची तयारी : बाप्पाच्या मूर्तीवर अखेराचा हात फिरवण्यात कारागीर व्यस्त
बाप्पाच्या मूर्तीवर अखेराचा हात फिरवण्यात कारागीर व्यस्त
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात
गणरायांच्या आगमनाला अवघ्या तीन आठवड्याचा काळ राहिला असून अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्ती आकारास येऊ लागल्या आहेत.
गणरायांच्या आगमनाला अवघ्या दोन आठवड्याचा काळ राहिला असून अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून त्यासाठी बारा ते अठरा तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत.
विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा काही दिवसांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तींचे बुकिंग सुद्धा करून ठेवले आहे. सलग दोन वर्ष चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कामगार, रंग देण्यासाठी लागणारे कामगारांना चांगली मागणी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार बारा ते अठरा तास कारखान्यांमध्ये थांबत आहेत. गणपतीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे, मूर्ती वर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक करणे, आदी कामे कामगार करीत आहेत. दरम्यान, यंदाच्या वर्षी रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस, अशा कच्चा मालाच्या किंमतींमध्ये थोडी वाढ झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीमध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चौकट
गेल्या दोन महिन्यांपासून गणेशाची मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. यंदा पाऊस चांगला आहे. आमच्याकडे १०० ते ३००० रुपयांपर्यंत किमतीच्या गणेश मूर्ती उपब्ध आहेत. चांगली विक्री होईल याची अपेक्षा आहे.
आश्रुबा कुंभार
येरमाळा
Comments
Post a Comment