होमगार्ड भरती प्रकरणी गुण बाबत काही आक्षेप असल्यास दि ३१ पर्यंत दाखल करण्याचे अवाहन

होमगार्ड भरती प्रकरणी गुण बाबत काही आक्षेप असल्यास दि ३१ पर्यंत दाखल करण्याचे अवाहन

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
दि २९ ऑगष्ट २०२४ 

होमगार्ड भरती प्रकरणी गुण बाबत काही आक्षेप असल्यास ईमेलद्वारे दि ३० ऑगष्ट रोजी किंवा  दि ३१ ऑगष्ट रोजी होमगार्ड  कार्यालयत मुळ अर्ज सह हजर राहुन आक्षेप दाखल करता येणार असल्याचे  होमगार्ड कार्यालया कडून कळवीण्यात आले आहे ,

 धाराशिव जिल्हा होमगार्ड तर्फे पथक धाराशिव, तुळजापूर, भुम, कळंब, उमरगा, परांडा, उपपथक येडशी या पथकातील अनुशेष रिक्त असल्यामुळे दिनांक २२ ऑगष्ट २०२४ ते दिनांक २६ ऑगष्ट २०२४ रोजी  पर्यंत नाव नोंदणी (भरती) प्रक्रिया राबविण्यात आली होती.

 त्यामध्ये धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्यांची यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
जे उमेदवार ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहतात व ते पोलीस स्टेशन ज्या पथकामध्ये येतात त्यांची यादी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे ,

अंतर्गत पोलीस स्टेशन धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, बेंबळी, आनंद नगर
तुळजापूर, तामलवाडी, नळदुर्ग
कळंब, शिराढोण, येरमाळा
उमरगा, मुरूम, लोहारा भुम, वाशी
परांडा, अंबी ढोकी
वरील प्रमाणे येत असून ज्या उमेदवारांचे पथक, उपपथक, पोलीस स्टेशन, तांत्रिक गुण, धावणे व गोळाफेक गुण या बाबत काही आक्षेप असल्यास दिनांक ३०/०८/२०२४ रोजी या Email-dchgosmanabad@yahoo.com वर वेळ सायंकाळी २०:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावा. जर या दिनांकापर्यंत आक्षेप नोंदविण्यास अश्यक्य झाल्यास त्यांनी दिनांक ३१/०८/२०२४ रोजी जिल्हा समादेशक, होमगार्ड कार्यालय, खाँजा नगर, देवी मंदिर रोड, धाराशिव येथे प्रतक्ष हजर राहुन मुळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह स्वतः, स्व:खर्चाने हजर राहून आक्षेप नोंदवावा.
आक्षेप नोंदवितांना आपला अर्ज नोंदणी क्रमांक, छाती क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, पथक / उपपथक, पोलीस स्टेशन व आपला आक्षेप स्पष्ट पणे नोंदवावा. जर सदर दिनांकापर्यंत आपला आक्षेप नोंदविला नाही तर त्या उमेदवारांची नंतर कसल्याही प्रकारची तक्रार मान्य केली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन  गौहर हसन 
अप्पर पोलीस अधिक्षक तथा
जिल्हा समादेशक होमगार्ड धाराशिव यांनी केले आहे ,

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न