जनहित पतसंस्थेला सलग तिसऱ्यांदा दिपस्तभ पुरस्कार प्रदान

जनहित पतसंस्थेला सलग तिसऱ्यांदा दिपस्तभ पुरस्कार प्रदान 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी नितीन बारकुल 

  येरमाळा ( दि ९ ) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने येरमाळा ता. कळंब येथील जनहित ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला  सन २०२४ चा प्रथम क्रमांक चा दिपस्थंब पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे 
 
 स्थापने पासुन हि सस्था सतत म्हणजे २० वर्षा पासुन नफ्यात आहे यांचा ऑडीट वर्ग अ आहे याशिवाय सीडीरेशु ८५ टक्के आहे व एनपीए ०५ टक्के आहे आहे,

संस्था व्यवसाईक गरजवंत छोटे व्यापारी दुध उत्पादक कारागीर महिला बचतगट सोनेतारण कर्ज मॉडीगेज कर्ज पिग्मीतारण कर्ज देऊन या पंचक्रोशीत बॅकिंग सेवा देत आहे याशिवाय महावितरण कंपनीचे अधिकृत विजभरणा केंद्र दोन २४ तास चालणारे एटीएम मशिन आहेत,

 लॉकर सुविधा मोबाईल बॅकिंग आरटीजीएस एन ई एक टी मोफत सेवा देत आहे याशिवाय आय एसओ मानांकन प्राप्त पतसस्था असून वार्षिक उलाढाल १५० कोटी रुपयांची आहे याशिवाय सामाजीक व आर्थिक शिस्त लावण्याचे मोठे कार्य हि संस्था करीत आहे यामुळे महाराष्ट्र राज्य पतसस्था फेडरेशन मुंबईने या सर्व कार्याची व निकषाची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर विभागातून १० कोटी ते ३० कोटी गटातून प्रथम क्रमांकाचा सहकार क्षेत्रातील अतिशय महत्वाचा व प्रतिष्ठीत समजला जाणारा दिपस्तभ पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष  ओमप्रकाश (काकासाहेब ) कोयटे कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलींद काळे गोदावरी फाऊडेशनच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई पाटील फेडरेशनच्या सिईओ सुरेखाताई लावंडे याच्या हस्ते संस्थेचे संस्थापक तथा सहकार भारतीचे धाराशिवजिल्हा अध्यक्ष तथा फेडरेशचे निमंत्रीत सदस्य प्रा संतोष तौर ॲड महेंद्र कासार संचालक गणेश मोरे गोवर्धण उगडे अभिजीत पाटील पवन ओव्हाळ यांनी स्विकारला,
 हा शानदार कार्यक्रम तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसीटी येथे आयोजीत करण्यात आला होता,
या यशाचे मानकरी ठेवीदार कर्जदार पिग्मीधारक आरडी खातेदार सभासद पत्रकार हितचिंतक समस्त पंचक्रोशीतील गावकरी असल्याचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी सांगीतले व त्याचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न