पिक कर्जा साठी शेतकऱ्यांची आडवणूक करू नका बॅंक अधिकारीला धनंजय सावंत यांची सुचना ,

पिक कर्जा साठी  शेतकऱ्यांची आडवणूक करू नका  बॅंक अधिकारीला  धनंजय सावंत यांची सुचना ,

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज ,
दि ३ सप्टेबर २०२४ 

पिक कर्ज व  पिकविम्या साठी  शेतकऱ्यांची आडवणूक करू नका अश्या सुचना जिल्हा परिषदे चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी अनाळा येथिल महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या अधिकारी  दिल्या आहे ,

धनंजय सावंत हे सध्या नागरीकांच्या अडचणी जाणून घेण्या साठी  गावभेट  दौरे करीत आहे या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी अनाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतुन पिक कर्ज वाटप होत नसल्याची अडचण व सध्या सोयाबीन व इतर पिकांच्या पिक विम्याचे हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत आहेत त्यातुन  पुर्वीच्या   कर्जांचे हप्ते कपात करण्यात येत असल्याची अडचण जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पुढे शेतकऱ्यांनी  मांडली.

तोंडावर आलेले सणाचे दिवस लक्षात घेऊन सावंत यांनी शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन आनाळा बॅंकेच्या व्यवस्थापाकाची तात्काळ भेट घेतली व  पिक कर्ज,पिक विम्यातुन पुर्वीच्या कर्जांचे हप्ते कपात या दोन्ही विषयावर चर्चा केली. पिक विमा हप्त्यातुन पुर्वीचे कर्ज कपात करु नका व पिक कर्ज वितरण सुरू करण्याची मागणी सावंत यांनी व्यवस्थापकाला केली.
यावेळी पिक कर्ज  वितरणाची आपली मर्यादा संपली  असल्यामुळे मुख्य कार्यलयातुन आदेश आल्याशिवाय आम्ही पिक कर्ज वितरण करु शकत नाही असे बॅंक व्यवस्थापकानी  सांगताच धनंजय सावंत यांनी  पिक कर्जा बाबत लागलीच जिल्हाधिकारी यांच्यासी फोन करून संपर्क साधला तर याविषयी चर्चा केली.

त्याच बरोबर हा प्रश्न पालक मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढे मांडून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न