शिक्षक दिन उत्साहात साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
(पुणे दिनांक ५ सष्टेंबर)
महान शैक्षणिक तत्त्ववेत्ता आणि प्रख्यात मुत्सदी, विद्वान, भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन सर्व भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या सभागृहामधे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी व प्राचार्या प्रीती दबडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्यादेवता सरस्वती व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शिक्षक प्रतिनिधी सारीका मोकाटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्ये तसेच विविध कलाविष्कार दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्शला मस्करनीस व ऐश्वर्या जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन बंगारम्मा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित लघुपटाने झाली याचे आयोजन विजया पवार यांनी केले होते. तसेच मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस ते मुले शाळेत रुळल्या नंतर असा प्रवास विनोदी नाटक व गाण्यातून दाखवण्यात आला,जो विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन प्रीती दबडे यांच्या मार्गदर्शनांतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग सदस्य भाग्यश्री कानडे, ऐश्वर्या जाधव, बंगारम्मा पाटील, मनीषा मोरे व पायल जाधव यांनी केले होते.
Comments
Post a Comment