इंग्लिश मीडियम आकुर्डी शाखेच्या प्राचार्या प्रिती दबडेजिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित
जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.६ ) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने 'जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार २०२४' ने सन्मानित करण्यात आले.
विद्यालयाच्या प्राचार्या यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या सक्रिय वाटचालींचा आढावा घेत या पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्या नेहमीच प्रयत्नशील असतात व विविध उपक्रम राबवत असतात. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्या अनेक पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करतात व पर्यावरणाबाबत जागृती आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचा निरंतर प्रयत्न करतात. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद व पालक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment