आ. कैलास पाटील यांच्या विजयाचा येरमाळा येथे जल्लोष
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा दि २४
आमदार कैलास पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झाल्याने संपुर्ण मतदार संघात जल्लोष करण्यात आला येरमाळा येथे आमदार कैलास पाटील यांच्या विजयामुळे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला,
लोकसभेतील निकाला प्रमाणेच विधानसभेत ही येरमाळा गावातील लीड कायम ठेवण्यात गावातील कार्यकर्त्यांना यश आले गावातील सर्व बुथवर आघाडी घेऊन एकूण ६२४ अधिकचे मताधिक्य कैलास पाटील यांना गावातून मिळाले ,
तसेच येरमाळा शिवसैनिकांच्या वतीने आमदार कैलास घाडगे पाटील यांचा धाराशिव येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुनील पाटील, आबासाहेब रुमणे, अनिल पवार, समाधान बारकुल, विभाग प्रमुख राहुल पाटील, लहू पाटील, शहरप्रमुख मारुती बारकुल, नितीन बारकुल, सचिन पाटील, हर्षल बारस्कर, अमर बारकुल, नागेश तोडकरी, दादा बारकुल, समाधान बाराते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment