अँड फरहीन खान-पटेल यांना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्कार प्रदान
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
उमरगा ( दि २८ )
उमरगा येथिल अँड फरहीन खान-पटेल यांना
युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे ,
ॲड फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहेत सन 2012 पासून वकिली क्षेत्रात कार्यरत आहे तसेच कायदेविषयक शिबिर मार्फत तसेच सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम,अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम आणि महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम इत्यादी अशा सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क ,जबाबदारी तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण, सशक्तिकरण, आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत आहे ,
तसेच विविध महापुरुषाच्या जयंती निमित्त लेख ,व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जन माणसापर्यंत पोहोचवणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत आहेत तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वलिखित काव्यरचनांच्या द्वारे आपले विचार मांडत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार , अव्यक्ति अबोली मंच तर्फे वनश्री पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाबका यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार ,
प्राप्त झालेले आहेत.
तसेच लेखणी रत्न साहित्य ई पुरस्कार, काव्य लेखन ई पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त, राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रविवार दि.२४/११/२०२४ रोजी संपन्न झाला.
संस्थापक अध्यक्ष- प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे, अध्यक्ष- पिंकीताई सागर वाघमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष -रितेश वाघमारे.
सोनाली सुता,र स्वप्नाली सुतार.
अमर चौरे ,हरेशभाई देखने
-प्राध्यापक संपत गारगोटे,
प्रमुख साहित्यिक -देवीलाल रौराळे . प्रमुख आकर्षण क्रांतीनाना मळेगावकर
आरोही हिवरकर (अभिनेत्री) काव्या मुंबईकर ,युवा लावण्यवती रेखा गायकवाड, अभिनेत्री मोहिनी कदम, रिल स्टार मोनिका कंठाळे , याच्या उपस्थितीमध्ये युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ यांच्यातर्फे अँड. फरहीन खान-पटेल याना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment