संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे येरमाळ्यात जंगी स्वागत,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बागुल
येरमाळा ता कळंब येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले, आंतरवाली सराटी वरून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेण्यासाठी व पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हजारो गाड्या सह ताफा येरमाळ्यात आला असता येरमाळा सर्कलच्या वतीने संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे भव्य दिव्य जंगी स्वागत करण्यात आले.
तुळजापूर व पंढरपूर दर्शनासाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे निघाले असता त्यांच्या सोबत जवळपास हजाराहून अधिक गाड्यांचा ताफा समाज बांधवांचा होता येरमाळा या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने भव्य हाराने पाटलांचे आई येडेश्वरीच्या येरमाळा नगरीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले यावेळी धाराशिव कळंब चे आमदार कैलास दादा पाटील यांची ही उपस्थिती होती व घोषणाने येरमाळा परिसर दुमदुमला.
Comments
Post a Comment